सगळ्या प्रकारचे फंडे वापरून झाल्यावर, जो मुद्दा सगळ्यात आधी कळला होता पण खूप कष्टाचा वाटला होता तोच परत निवडा...कुठला ?
ऑनलाईन ब्लॉगिंग...
अत्ताच्या घडीला सगळ्यात उत्तम पर्याय हाच आहे. याला लागणारे कष्ट जेवढे कठीण तितकंच ह्याच फळ मोठं आणि गोड सुद्धा...
सुरवातीला पैसे कुणाकडे असतात? त्यामुळे सुरवात पूर्णतः मोफत करून जर नंतर चांगले पैसे मिळवायचे असतील तर हा एक Authentic पर्याय आहे. गूगल के पास देर है अंधेर नहीं !
काय लागतं ब्लॉग लिहायला? लागतो तो एक चांगला, अनोखा ( Unique ) विषय आणि त्याची मांडणी. सुरवातीला वाटणारी हि अवघड गोष्ट नंतर नंतर सोपी होत जाते. त्यात आणखी चांगली गोष्ट म्हणजे, सध्या तुम्हाला मराठी लिहिण्यापेक्षा English भाषा सोपी वाटत असेल तर English भाषेत आधी लिहा आणि Google चं translation tool ( https://translate.google.com/ ) वापरा. घ्या, हा हा म्हणता तुमचा ब्लॉगचा Content मराठीत तयार होईल.
ह्या Content साठी, कुठल्याही इतर website चा आधार घेणं प्रकर्षानं टाळा. Copy Paste तर मुळीच नको. गुगल काका फार हुशार आहेत. Content पोस्ट व्हायच्या आधी त्यांना कळालेलं असेल कि हा कन्टेन्ट तुमचा स्वतःचा कि चोरीचा.
ब्लॉग तयार झाल्यावर तुम्ही जेव्हा तो Publish कराल, त्यानंतर काही महिन्यातच तुमच्या ब्लॉगला ऍडसेन्स अकाऊंटचं अप्रूव्हल मिळालेलं असेल.
आणि त्यासाठी किमान रोज एक पोस्ट नवीन टाका, आपल्या इतर सोशल साईट्स वर आपल्या ह्या नवीन ब्लॉग (तुमच्या नवीन ब्लॉग) ची जाहिरात करायला विसरू नका. जास्तीत जास्त Views मिळवा.
अभिप्राय द्यायला विसरू नका, थोडं मलाही आणखी सुधारता आलं तर आनंद आहेच...
Content लिहायला जरूर सुरु करा, तो पर्यंत पुढच्या पोस्ट वर, ब्लॉग तयार कसा करायचा? आणि तो हि पूर्णतः मोफत.... हे पाहूच..!
No comments:
Post a Comment