Hello,
काय जातं ?
Thank You, Google! For, giving many languages as options. One of Google's key steps in helping the World to Get More Closer. So from here on, you can read this page in any language you want ...
पूर्ण ब्लॉग मराठीतून वाचून झाल्यावर, एकदा Page Translate करून पहा. ही छोटी गोष्ट नाही जी गुगलने ही गोष्ट मिळविली ... ह्यासाठी गूगल कडून खूप मोठी मेहनत घेण्यात आली आहे.
तर, ह्या आधी बऱ्याच वेळेला आपल्या स्व-भाषिकांसाठी Blog च्या विषयांची निवड करताना भाषेचाच मुख्य अडथळा होता. त्यामुळे Online Income साठी याआधी असलेले पर्याय फार कठीण आणि कमी मिळकतीचे होते पण 7 ऑक्टोबर 2019 पर्यंत Google ने खूप साऱ्या भाषा Ad-sense करिता Monetize करायला सुरुवात केली आहे त्यात Marathi भाषेचाही समावेश केला, अपेक्षा आहे उरलेल्या भाषा देखील लवकरच Add होतील.
आपण रोज खूप प्रयत्न करतो, रोज Google वर येऊन Earn Daily / Daily Income Online Source Without Investment शोधतो. मग आपल्याला Copy Paste, Captcha Work, PDF To Word/Excel, Image To Word/Excel असे बरेंच पर्याय मिळतात, त्यापैकी बरेचसे पर्याय Fraud निघतात. ह्यातले जाहिरात करताना "Without Investment / No Fees" अशी करतात, पण एकदा का तुम्ही त्यांच्या Web Site वर Registered झालात कि मात्र One Time Security Charges मागतात. मग ते Refundable आहेत असाही दावा करतात.
काही जण तर ह्याही पलीकडे गेलेत. काम करायला Workers मिळवण्यासाठी Free Add Posting Website वरून आपले (गरजू माणसांचे) Mobile Numbers मिळवतात आणि एखाद्या BPO ला Numbers पाठवतात आणि मग त्यांनी पढवल्याप्रमाणे BPO Agent तुम्हाला पटवून देतात, Agreement Soft Copy सुद्धा Android Mobile च्या स्क्रीन वर तुमची Digital Signature घेऊन, तुम्हाला हमी देतात.
मग ठरल्या प्रमाणे तुम्हाला Agreement Soft Copy येते, त्यात इतर Conditions व्यतिरिक्त मुख्य कंडिशन असते ती Minimum Accuracy ची, ती तुम्ही साधली नाहीत तर मात्र तुम्हाला पैसे अदा करावे लागतील अशी अटच घातलेली असते. तुम्हाला त्वरित काम करण्यासाठी Company कडून Software Link पाठवली जाते किंवा Company च्या एखाद्या Web Site ची लिंक आणि काम करण्यासाठी User ID आणि Password पाठवला जातो.
आणि तंबी दिली जाते तुम्ही ह्या Software चा वापर सुरवातीपासून ज्या Computer/Mobile वर कराल त्याच ठिकाणी सुरु ठेवावं लागेल. इथेच तर खरी गोम आहे. वापरकर्ता एकच असताना ह्यांच्या बापाचं काय जातं ?
काय जातं ?
सांगतो, तुम्हाला दिलं गेलेलं Software/Web Site मध्ये आधीच Programming करून ठेवलेलं असतं, तुम्ही काम करत राहता तिथं पर्यंत तुम्ही Feed केलेला सगळा Data अगदी तसाच असतो जसा तुम्ही तो एंटर केला आहात, ज्यावेळी Submission ची वेळ येऊन तुम्ही SUBMIT बटणावर क्लिक करता त्यावेळी तुम्ही Feed केलेला Data त्यांच्या Accuracy Parameters च्या आत आपोआप बिघडवला जातो. तुम्ही Data Submission करून निवांत झालेला असता. दोन-तीन दिवस होतात आणि Company Help Representative चा तुम्हाला कॉल येतो. तुम्ही Submit केलेल्या Work Load मध्ये खूप चुका आहेत, त्यामुळे तुम्हाला Salary मिळणार तर नाहीच पण Penalty म्हणून अमुक एक रक्कम Company च्या खात्यात जमा करावी लागेल, अन्यथा Agreement नुसार कायदेशीर कारवाईला सामोरे जा.
मग काय, बाहेरच्या जगाचा अजिबात अनुभव नसणारे आपण आणि हे Online जगासाठी नवीन असणारे आपले आई-वडील, 'कोर्टकचेऱ्या नकोरे बाबा' ह्या कारणासाठी सांगितलेले पैसे भरून दगडाखालचे हात सोडवून देतात. परत आपला नवीन कामाचा शोध चालू होतो, परत ती तशीच कामं आणि तीच ती कोर्टाच्या नावाखाली धमकी, पण ह्यावेळेला मात्र आपण सावध झालेले असतो. ह्यावेळी Download केलेली Agreement Copy आपण तपासून पाहतो, ह्यावेळी ह्यात Registration Number च नाही अशी आपल्याला उकल होते. आणि आपण आधिचंही Agreement काढून बघतो तर त्यातही Number नसल्याने आपण फसवल्या गेल्याचं दुःख होतं...
ह्या सगळ्या जाचातून मोकळं व्हायचं असेल तर आधी त्या Company ची Authenticity पडताळून पाहायला हवी. त्यासाठी https://scamadviser.com ह्या सारख्या आणखीही काही Sites आहेत. बरं इथेही सत्यता 100% खरी मिळेलंच असं नाही, तेव्हा Google काका आहेतच मदतीला, फक्त Company चं नाव आणि त्यापुढे Review असं टाका. आपल्या आधी काम करून अनुभव घेणाऱ्या बऱ्याच लोकांचा चांगला-वाईट प्रतिसाद आपल्याला पाहायला-वाचायला मिळेल.
एव्हडं सगळं होऊन मग अक्कल येते कि, Blog चा विषय निवडणं ह्या इतर खटाटोपा पेक्षा कैक सोपा आहे आणि Authentic सुद्धा...
माझी सुद्धा हि ह्या Blog ने सुरुवात आहे. लवकरच पुढची Post सुद्धा लिहायला घेत आहे. धन्यवाद..!
No comments:
Post a Comment